गांधींविषयी गैरसमज निर्माण होण्याची काही कारणे…
इंग्रजांशी गांधींनी कधी शत्रूभाव ठेवला नाही. म्हणून येथील राष्ट्रवाद्यांना ते ‘परधार्जिणे’ वाटतात. आंतरराष्ट्रीयवादाची भलामण करतात, म्हणून ‘राष्ट्रवादविरोधी’, भांडवलदार, उद्योगपतींच्या विरोधी गरळ ओकत नाहीत म्हणून समाजवाद्यांना ‘भांडवलवाद्यांचे हस्तक’ वाटतात. गरिबांच्या बाजूने हस्तक्षेपाला प्रोत्साहन देतात म्हणून ‘धनिकहितविरोधी’ ठरतात. सवर्णांना शिव्या देत नाहीत म्हणून ‘सवर्णहितविरोधी’ मानले जातात.......